कोडे संग्रह-
१.दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी- डोळे.
२.तळ्याकाठी सुटतो गार गार गारवा सांगा कुणाला म्हणतात पारवा?-कबूतर.
३. तीन डोळे आहेत मला, माहीत आहे का नाव तुम्हाला?- नारळ
૪. घासता खोड सुटतो सुगंध, कपाळावर लावतात याचा गंध-चंदन.
५. सा-या प्राण्यात हुशार कोण? सांगेल त्याला बिस्किट दोन.-कोल्हा.
६.गुळगुळीत काचेवर जग दिसते,
कधी हसते तर कधी रडते-टेलिव्हिजन.
७.एका बाटलीत दोन रंग
मध्येच फुटले तर होतो बेरंग- अंडे.
८.एका विहिरीत एक राणी आणि बत्तीस पहारेकरी- तोंड, जीभ , दात.
९.गोड गोड बोलतो, डाऴ पेरु खातो.-पोपट.
१०.दोन पाय मोठे दोन पाय लहान
शेतात राबतो ताकद महान-ट्रँक्टर.
११.हिरवा पिवळा रंग माझा
म्हणतात मला फळांचा राजा.-आंबा.
१२.एका चेंडूसाठी अकरा जण
मधले दोन करती रन.-क्रिकेट.
१३.गोल गोल फिरा वाजतो बाजा
शेवटी उरणारा खुर्चीचा राजा.-संगीतखुर्ची
१૪.लांब मान पसरट पाय
ओझे वाहतो नाव काय?-उंट.
१५.कोणते हे फळ पोटात याच्या पाणी निर्मऴ-नारळ.
१६.कोणते हे फूल राजाच की
पाकळ्यांची यावर सुंदर झूल.-गुलाब.
१७.एक बसे एक उठे
खो म्हणताच पळत सुटे.-खो खो.
१८.एक फूल दोन माळी
मध्ये असते मोठी जाळी-बॅडमिंटन.
१९.पाठीवर कवच पोटात पाय
सांगा त्याचे नाव काय?-कासव
२०.गोरं गोरं माझं रुप
पोपटाला मी आवडतो खूप.- पेरु.
२१.मोठे मोठे डोळे माझे
पोटात माझ्या बिया काळे.-सीताफळ.
२२.सर्वांची ती मायमाऊली,
जग तिच्यावर जगते,
घामाचा ती घास घेते,
मोत्यांची ती रास देते.-जमीन.धरती.
२३.नदीकिनारी दाट झाडी,
कुण्या झाडाला असते दाढी?-वड.
२૪.अकबराच्या बागेत चार विहिरी
मधल्या जागी खेळती काळ्या गो-या पोरी.-कॅरम.
२५.दोरीतून सुटताच गरगर फिरतो
हातावर फिरताना गुदगुल्या करतो.- भोवरा.
Nice 👍👍👍
ReplyDelete