बालिका दिनानिमित्त विविध उपक्रम
3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन जि प प्राथमिक शाळा अभोणा मुले येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बालिका दिनानिमित्त शाळेत रंगीत वेशभूषा व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल हिरे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री हरिश्चंद्र देसाई,भिकन बागुल, सुधीर बिरार,राजू हिरे,आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वकृत्व व रंगीत वेशभूषा स्पर्धा घेऊन प्रत्येकी तीन विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
वकृत्व स्पर्धेत प्रथम - हर्षवर्धन महाजन, द्वितीय - मितेश जाधव तृतीय - शिव गवळी तसेच रंगीत वेशभूषा - निखिल चव्हाण, पवन चौधरी, आदित्य चौधरी, उत्तेजनार्थ संस्कार देवघरे आदि विजयी स्पर्धकांना गौरविण्यात आले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री दौलत साबळे, शिक्षक चंद्रकला चव्हाण, चित्रा देवरे, व निकुंभ सर यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment