Tuesday, 3 January 2023

गणित प्रदर्शन

गणित दिनानिमित्ताने गणित तज्ञ रामानुजन यांच्या जयंती निमित्त शाळेत गणित दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्त्व मुलांना सांगण्यात आले. रामानुजन यांच्या विषयी सविस्तर माहिती देवून त्यांना प्रेरणा दिली. त्यानंतर मुलांना वर्गातील सर्व साहित्य मांडून गणिताचे प्रदर्शन मांडण्यात आले. बऱ्याच मुलांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. यात मणी माळ. संख्या पट्ट्या , संख्या चक्राने संख्या वाचन, व्यापार खेळ, संख्या कोडे, शतकगट्टे, आडवी उभी बेरीज तक्ता, अपूर्णांक, घड्याळ वाचन, संख्या स्थानिक किंमत ,यासारखे विविध प्रकारचे गणिती प्रदर्शन मांडण्यात आले.यात मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. इतर मुलांना छोट्या छोट्या कृतीतून गणिताच्या क्रिया करून त्यांचे ज्ञान वाढवले ,तसेच मार्गदर्शन केले. अतिशय छान वातावरण हसत खेळत हा गणिती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यासाठी सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले . गणित प्रदर्शन यशस्वी केले.

No comments:

Post a Comment