कल्पना चावला

                 

  कल्पना चावला(मार्च १७इ.स. १९६२:कर्नाल,हरयाणा--फेब्रुवारी १इ.स. २००३:टेक्सासवरअंतराळात) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथममहिला होती.बालपणकल्पना चावलायांचा जन्म १ जुलै 1962 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांनामित्र मैत्रिणींबरोबरसायकलनेट्रीप ला जाण्यात रस वाटे.त्यांना बाहेर च्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या.शिक्षणकल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले.कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. शिक्षकांच्या ही त्या लाडक्या झाल्या होत्या. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या.भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले.संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकाऱ्यांनी कल्पना स्त्री आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.विवाहशैक्षणिक काळात कल्पना यांची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचाविमानाचेप्रशिक्षणदेण्याचा व्यवसाय होता. त्यांच्याकडून कल्पना यांना विमान शिकता आले. तसेच स्कूबा डायव्हिंग हा रोमांचकखेळप्रकारही त्यांना जेपी यांच्याकडून शिकता आला. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. जेपी हे मुळचे फ्रेंच होते. त्यांचेमैत्रीचेनातेप्रेमातबदलले व १९८४ साली जेपी व कल्पना यांचाविवाहझाला. लग्नानंतर त्यांना विमान नीट उडवण्यासयेऊ लागले. त्यांचीसंगीतातीलआवड वाढू लागली.[संदर्भ हवा]

कार्यडिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.मृत्यू१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.कराडचेकल्पना चावला विज्ञान केंद्रकल्पना चावला यांच्या मृत्यूने व्यथित झालेल्याकराडच्याटिळक’ हायस्कूलमधील संजय पुजारी नावाच्या विज्ञान शिक्षकांनी कल्पना चावलांच्या वडिलांच्या, बनारसीलाल चावला यांच्या परवानगीनेकराडमध्येकल्पना चावला विज्ञान केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र मुलांमध्ये विज्ञानाचा प्रसार करून त्यांना विज्ञानाची गोडी लावण्याचे कार्य करत नाही. तेथे फक्त कागदाची विमाने करायला शिकवतात. लाला पडणार्या प्रश्नांची उत्तरे त्याला प्रत्यक्ष कृतीमधून शोधता आली पाहिजेत, विज्ञानाच्या निकषांवर त्याला विचार करता यायला पाहिजे, प्रयोग करता आले पाहिजेत, अशी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोरठेवून उभे केलेले हे ’कल्पना चावला विज्ञान केंद्र’, संजय पुजारी यांनी १ जुलै २००६ या दिवशी स्थापन केले.कल्पना चावला विज्ञाना केंद्राचे कार्य कसे चालते, हे पाहण्यासाठी कल्पनाचे वडील बनारसीलाल चावला यांनी केंद्राला भेट दिली होती. त्यांनी केंद्राचे काम पाहून मोठी देणगीसुद्धा दिली. कल्पना चावला यांच्या भगिनी सुनीतादीदी यांनीही ५० हजार रुपये किमतीची पुस्तके या केंद्रासाठी दिली. भारतात या नावाचे हे एकमेव केंद्र असेल अशी ग्वाही बनारसीलाल यांनी दिली.या विज्ञान केंद्राचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. ग्रंथालयात निसर्ग, पर्यावरण, विज्ञानाच्या विविध मूलभूतशाखा यांविषयीची अनेक पुस्तके, विश्वकोश, चरित्रे, विज्ञानाशी संबंधित सीडी आणि डीव्हीडी असा मोठा संग्रह मुलांना संदर्भासाठी उपलब्ध करून दिला जातो.‘शाळेबाहेरची शाळा’ असे या केंद्राच्या कार्याचे स्वरूप आहे. हसतखेळत आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञानाचे शिक्षण देणे हे कल्पना चावला विज्ञान केंद्राचे धोरण आहे. या दृष्टीने केंद्राचे समन्वयक म्हणून काम करणारे पुजारी सर आणि त्यांना मदत करणारे त्यांचे इतर शिक्षक सहकारी सतत प्रयत्नशील असतात.मी रितेश घारे. प्रत्येक शाळेत फिरून ते एडमिशन गोळा करतात आणि फुकटचे पैसे वाया जातात. कृपया ह्या केंद्राकडे जाऊ नये.केंद्राचे कार्यक्रम आणि उपक्रमवर्षांतल्या ५२ रविवारी आणि अन्य सुट्ट्यांच्या दिवशी कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये विविध विज्ञानविषयक कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले जाते. आकाशनिरीक्षण, विमानांच्या आणि अग्निबाणांच्या प्रतिकृती, पक्षिनिरीक्षण, वनस्पतींची ओळख, औद्योगिक क्षेत्रांना तसेच विज्ञान संशोधन केंद्रांना भेटी, जंगलभ्रमंती, शास्त्रज्ञांची, तज्ज्ञांची व्याख्याने, खेळण्यांमधून विज्ञान समजून घेणे, शालेय पुस्तकातील विज्ञानाची तत्त्वे प्रयोगांच्या आधारे समजून घेणे अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमांतून मुलांना विज्ञानाची गोडी लावण्याचे काम या विज्ञान केंद्रात केले जाते.कल्पना चावला विज्ञान केंद्राचा साचेबद्ध असा कोणताही कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम नाही, वेळापत्रक नाही, परीक्षा नाहीत आणि म्हणूनच कोणतेही ताणतणाव नाहीत. प्रत्येक रविवार वेगळा असतो. त्यामुळे मुलेसुद्धा प्रत्येक रविवारची आणि सुट्टीच्या दिवसाची वेगळ्या अर्थाने वाट पाहत असतात.
विज्ञान शिकण्याची वेगळी पद्धतकल्पना चावला केंद्रात शिकविण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. केंद्रातली मुले जर एखाद्या विमानाची प्रतिकृती तयार करणार असतील तर त्याआधी ही मुले विमानबांधणीशास्त्र, वायुगतीशास्त्र यातील संकल्पना स्लाइड शो किंवा फिल्म्सच्या माध्यमातून समजून घेतात. काही तज्ज्ञ व्यक्तींना या संदर्भात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले विमानांच्या प्रतिकृती तयार करतात.थोडक्यात, या उपक्रमामधून केवळ विमानांच्या प्रतिकृती करण्याचे कौशल्य मुले शिकत नाहीत तर त्यामागचे विज्ञानसुद्धा समजून घेतात. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञडॉ.जयंत नारळीकर, विज्ञान प्रसारकअरविंद गुप्ता, ज्येष्ठ आकाश अभ्यासकहेमंत मोने, विज्ञानलेखक प्रा.मोहन आपटेअशा अनेक नामवंतांशी संवाद साधण्याची संधी कल्पना चावला विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कराडच्या मुलांना मिळाली आहे.पुजारी सरांनी कल्पना चावला विज्ञान केंद्रातर्फे २००८ साली नाट्यरूपांतराच्या आणि सिनेमाच्या माध्यमांतूनही विज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. ३४ बालकलाकारांना घेऊन ‘धमाल विज्ञानाची’ हा बालचित्रपट केंद्राने तयार केला.गॅलिलिओगॅलिली, सर आयझॅकन्यूटनआणि थॉमस अल्व्हाएडिसनहे तीन शास्त्रज्ञ मुलांना भेटतात आणि आपण लावलेल्या शोधांबद्दलचे प्रयोग त्यांना दाखवितात, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’ ही कराडची नवी ओळख झालीआहे.कल्पना चावला यांचे मराठी सुविचार*.मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता.हेही पहा*.भारतकन्या कल्पना चावला (पुस्तक)

No comments:

Post a Comment