कृतीयुक्त गाणी


                कृतीयुक्त गाणी



💃 🕺 *चाळणीतल पीठ*    💃🕺
━━━━━━━━━━━━━━━━
   *100  % मूलभूत वाचन क्षमता प्रशिक्षण कार्यक्रम अंर्तगत......*

 *चाळणीतल पीठ म्हणे....२ वेळा*
 *चाळणीतल पीठ म्हणे , चाळ मला नीट.....*
*चाळ मला नीट म्हणे , चाळ मला नीट....*
*चाळणीतल पीठ म्हणे , चाळ  मला नीट....*

🎤 *कोपर्‍यातली काठी........२वेळा*
*कोपर्‍यातली काठी म्हणे लागेन मी पाठी....*
*लागेन मी पाठी म्हणे , लागेन मी पाठी...*
*चाळणीतल पीठ म्हणे , चाळ मला नीट...*
*चाळ मला नीट म्हणे , चाळ मला नीट...*

 🎤 *पावसातला वारा......... २ वेळा*
*पावसातला वारा म्हणे , गारा वेच गारा...*
*गारा वेच गारा म्हणे , गारा वेच गारा...*
*चाळणीतल पीठ म्हणे , चाळ मला नीट...*
*चाळ मला नीट म्हणे , चाळ मला नीट...*

 🎤 *कढईतली पुरी.....२ वेळा*
*कढईतली पुरी म्हणे , किती मी गोरी*
*किती मी गोरी म्हणे , किती मी गोरी....*
*चाळणीतल पीठ म्हणे , चाळ मला नीट...*
*चाळ मला नीट म्हणे , चाळ मला नीट...*




     💠 *कृतीयुक्त गाणी*  💠
    🦅 *ढगाच घरट सोडून दुर...* 🦅
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन विकास क्षमता प्रशिक्षण कार्यक्रम अंर्तगत....*


🦅 *ढगाच घरट सोडून दूर.*
   *पावसाच पाखरु आलय दुरून..*
  *अलगद त्याच्या पंखावरून..*
 *येईल भिजून गं येईल भिजून.. ॥धृ ॥*

🦅 *घेतलीया गिरकी वार्‍यावर..*
      *हळूच डोलतय तालावर..*
      *हळूच फुल मी घेईन खुडून..*
  *घेईन खुडून मी घेईन खुडून...॥   १॥*

🦅 *आलय माझ्या मिञाच घर..*
   *खुणेन म्हणेन मी खाली उतर..*
   *करीन हात मी त्याला दुरून..*
    *त्याला दुरून ग त्याला दुरून...॥ २ ॥*

🦅 *पावसाच पाखरू हसतयं छान..*
  *सोन्याच्या उन्हात डुलतय पान..*
  *पानाच्या आडाला राहिन दडून..*
 *राहिन दडून ग राहिन दडून...॥ ३ ॥*

   



    💠 *बोलीभाषेतील कृतीगीत* 💠
      🌸 *रानाच फुल* 🌸
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन विकास क्षमता प्रशिक्षण कार्यक्रम अंर्तगत....*

🌸 *गेलो होतो , गेलो होतो रानाला रे.....*
*गेलो होतो , गेलो होतो रानाला......*
*हे....रानाच फुल माझ्या कानाला रे....*
*रानाच फुल माझ्या कानाला....॥ १ ॥*

🥀 *गेलो होतो , गेलो होतो भेंडीला रे....*
*गेलो होतो , गेलो होतो भेंडीला......*
*हे....भेंडीच फुल माझ्या शेंडीला रे......*
*भेंडीच फुल माझ्या शेंडीला....॥ २ ॥*

🌾 *गेलो होतो , गेलो होतो भाताला रे.......*
*गेलो होतो , गेलो होतो भाताला...*
*हे...भाताच फुल माझ्या हाताला रे.........*
*भाताच  फुल माझ्या हाताला....॥ ३ ॥*

🌺 *गेलो होतो , गेलो होतो वास्ट्याला रे.....*
*गेलो होतो , गेलो होतो  वास्ट्याला.....*
*हे...वास्ट्याच फुल माझ्या कास्ट्याला रे.....*
*वास्ट्याच फुल माझ्या कास्ट्याला रे...॥ ४ ॥*


          *यमुनेच्या तिरी......*
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंर्तगत.........*

 🦅 *यमुनेच्या तिरी किती बुलबुल असतील , बुलबुल असतील , बुलबुल असतील ..हो..*sss
*एक तरी , दोन तरी , तीन तरी असतील हो....*sss
*चार तरी , पाच तरी , सहा तरी असतील हो....*sss
*सात तरी , आठ तरी , नऊ तरी असतील हो....*sss
*दहा तरी असतील हो........*ssss
*यमुनेच्या तिरी किती बुलबुल असतील , बुलबुल असतील ,बुलबुल  असतील..हो..*sss

🦅 *दहा तरी , नऊ तरी , आठ तरी असतील हो...*sss
*सात तरी , आठ तरी , सहा तरी असतील हो...*
*पाच तरी , तीन तरी , दोन तरी असतील हो....*
*एक तरी असतील हो.........*sss
*यमुनेच्या तिरी किती बुलबुल असतील ,बुलबुल असतील , बुलबुल असतील...हो..*sss      

 
 

1 comment: