Saturday, 31 August 2024

बालिका दिन

               बालिका दिनानिमित्त विविध उपक्रम 

3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन जि प प्राथमिक शाळा अभोणा मुले येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बालिका दिनानिमित्त शाळेत रंगीत वेशभूषा व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल हिरे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री हरिश्चंद्र देसाई,भिकन बागुल, सुधीर बिरार,राजू हिरे,आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वकृत्व  व रंगीत वेशभूषा स्पर्धा घेऊन प्रत्येकी तीन विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. 

वकृत्व स्पर्धेत प्रथम - हर्षवर्धन महाजन, द्वितीय - मितेश जाधव तृतीय - शिव गवळी तसेच रंगीत वेशभूषा - निखिल चव्हाण, पवन चौधरी, आदित्य चौधरी, उत्तेजनार्थ संस्कार देवघरे आदि विजयी स्पर्धकांना गौरविण्यात आले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री दौलत साबळे, शिक्षक चंद्रकला चव्हाण, चित्रा देवरे, व निकुंभ सर यांनी परिश्रम घेतले.


पारंपरिक खेळ

                               गोट्या खेळ


                              रस्सीखेच 
   
लंगडी

                                      कबड्डी 

                       पारंपरिक खेळ  

बुद्धिबळ स्पर्धा



        ‌                  अध्यक्ष चषक स्पर्धा 

सन 2023/24 या वर्षीच्या अध्यक्ष चषक स्पर्धेत आर्य सोनवणे याने बुद्धिबळ स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्याची जिल्हास्तरावर निवड झाली.या स्पर्धेमुळे त्याच्यात आत्मविश्वास वाढला. 

Saturday, 24 August 2024

कार्यशाळा (चिकट काम)



      कार्यानुभव कार्यशाळा 

                चिकटकाम ( दाळ चिकटवणे)

इयत्ता चौथीच्या वर्गात कार्यानुभव कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती दाळ चिटकवून विविध कलाकृती विद्यार्थ्यांनी तयार केली . स्वताच्या कल्पनेने ही कृती पूर्ण केली.

स्पेलिंग बी स्पर्धा


                   स्पेलिंग बी स्पर्धा 

सन 2023/24 मध्ये स्पेलिंग बी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेत इयत्ता चौथीतील विद्यार्थी हिमांशू ओझरकर याने तालुका स्तरावर यश संपादन केले व जिल्हा स्तरावर निवड झाली.