Saturday, 31 August 2024

बालिका दिन

               बालिका दिनानिमित्त विविध उपक्रम 

3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन जि प प्राथमिक शाळा अभोणा मुले येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बालिका दिनानिमित्त शाळेत रंगीत वेशभूषा व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल हिरे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री हरिश्चंद्र देसाई,भिकन बागुल, सुधीर बिरार,राजू हिरे,आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वकृत्व  व रंगीत वेशभूषा स्पर्धा घेऊन प्रत्येकी तीन विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. 

वकृत्व स्पर्धेत प्रथम - हर्षवर्धन महाजन, द्वितीय - मितेश जाधव तृतीय - शिव गवळी तसेच रंगीत वेशभूषा - निखिल चव्हाण, पवन चौधरी, आदित्य चौधरी, उत्तेजनार्थ संस्कार देवघरे आदि विजयी स्पर्धकांना गौरविण्यात आले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री दौलत साबळे, शिक्षक चंद्रकला चव्हाण, चित्रा देवरे, व निकुंभ सर यांनी परिश्रम घेतले.


पारंपरिक खेळ

                               गोट्या खेळ


                              रस्सीखेच 
   
लंगडी

                                      कबड्डी 

                       पारंपरिक खेळ  

बुद्धिबळ स्पर्धा



        ‌                  अध्यक्ष चषक स्पर्धा 

सन 2023/24 या वर्षीच्या अध्यक्ष चषक स्पर्धेत आर्य सोनवणे याने बुद्धिबळ स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्याची जिल्हास्तरावर निवड झाली.या स्पर्धेमुळे त्याच्यात आत्मविश्वास वाढला. 

Saturday, 24 August 2024

कार्यशाळा (चिकट काम)



      कार्यानुभव कार्यशाळा 

                चिकटकाम ( दाळ चिकटवणे)

इयत्ता चौथीच्या वर्गात कार्यानुभव कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती दाळ चिटकवून विविध कलाकृती विद्यार्थ्यांनी तयार केली . स्वताच्या कल्पनेने ही कृती पूर्ण केली.

स्पेलिंग बी स्पर्धा


                   स्पेलिंग बी स्पर्धा 

सन 2023/24 मध्ये स्पेलिंग बी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेत इयत्ता चौथीतील विद्यार्थी हिमांशू ओझरकर याने तालुका स्तरावर यश संपादन केले व जिल्हा स्तरावर निवड झाली.


Wednesday, 4 October 2023

कार्यशाळा (प्लॅस्टिकच्या पिशव्या बनविणे)


 

               ्प्लॅ्स्टि्कच्या पिशव्या पासून फुले बनवणे 

वर्ग सुशोभीकरण करण्यासाठी फुले बनवणे कार्यशाळा घेण्यात आली. प्लॅस्टिकच्या पिशव्या पासून ही फुले बनवली .यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांनी कृती बघून फुले बनविण्याचा प्रयत्न करीत होते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फुले बनविण्याचा छान प्रयत्न केला.

Tuesday, 3 January 2023

गणित प्रदर्शन

गणित दिनानिमित्ताने गणित तज्ञ रामानुजन यांच्या जयंती निमित्त शाळेत गणित दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्त्व मुलांना सांगण्यात आले. रामानुजन यांच्या विषयी सविस्तर माहिती देवून त्यांना प्रेरणा दिली. त्यानंतर मुलांना वर्गातील सर्व साहित्य मांडून गणिताचे प्रदर्शन मांडण्यात आले. बऱ्याच मुलांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. यात मणी माळ. संख्या पट्ट्या , संख्या चक्राने संख्या वाचन, व्यापार खेळ, संख्या कोडे, शतकगट्टे, आडवी उभी बेरीज तक्ता, अपूर्णांक, घड्याळ वाचन, संख्या स्थानिक किंमत ,यासारखे विविध प्रकारचे गणिती प्रदर्शन मांडण्यात आले.यात मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. इतर मुलांना छोट्या छोट्या कृतीतून गणिताच्या क्रिया करून त्यांचे ज्ञान वाढवले ,तसेच मार्गदर्शन केले. अतिशय छान वातावरण हसत खेळत हा गणिती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यासाठी सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले . गणित प्रदर्शन यशस्वी केले.